Home News & Events ISRO: Drawing and Quiz Competition: International Moon Day 2022

ISRO: Drawing and Quiz Competition: International Moon Day 2022

ISRO Drawing and Quiz Competition International Moon Day 2022
इस्रो: ऑनलाइन चित्रकला/रेखांकन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२
५३ वर्षांपूर्वी म्हणजे २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेच्या अपोलो ११ मोहिमेद्वारे चंद्रावर पहिला मानव उतरला. अपोलो ११ मोहिमेचा एक भाग म्हणून नील आर्मस्ट्राँगच्या चंद्रावरील लँडिंगच्या वर्धापनदिनानिमित्त आणि अंतराळ संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस हा संयुक्त राष्ट्रांचा दर २० जुलै रोजी साजरा केला जाणारा एक उत्सव आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी आंतरराष्ट्रीय चंद्र दिनाचे औचित्य साधून देशभरातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला/रेखांकन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व या स्पर्धेसाठी अर्ज मागविले आहेत.

 

स्पर्धेबाबत…
 • देशभरातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे विद्यार्थी ऑनलाइन चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात शकतात.
 • या स्पर्धा १९ जुलै २०२२ या तारखेपर्यंत खुल्या आहेत.
 • चित्रकला/रेखाटन व प्रश्नमंजुषा (Quiz) स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना इस्रोकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 • विद्यार्थ्यांच्या भावी करिअरच्या दृष्टीने ही स्पर्धा व प्रमाणपत्र अतिशय उपयुक्त आहे.
 • दोन्ही स्पर्धांमधील टॉप १० स्कोअरर्सचंही विशेष कौतुक होईल.  
चित्रकला/रेखाटन स्पर्धेबाबत…
 • चित्रकला/रेखाटन स्पर्धेचा विषय ‘चंद्र‘ (Moon) हा आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेने व कौशल्याने ‘चंद्र‘ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन A4 अथवा A3 साईझ कागदावर चित्र/रेखाटन करायचे आहे.
 • स्पर्धेसाठी केवळ मूळ (ओरिजिनल) चित्रे/रेखाचित्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.
 • विद्यार्थ्यांना त्यांची चित्रे/रेखाटने (स्कॅन करून अथवा फोटो) अधिकृत वेबसाइटवर अपलोड करावयाची आहेत.
 • पोर्टलवर केवळ पीडीएफ/पीएनजी/जेपीईजी फाइल अपलोड करण्याची परवानगी आहे.
 • फाईलचा आकार जास्तीत जास्त १ एमबीपेक्षा कमी असावा आणि आपण स्पर्धेसाठी फक्त एकच फाइल अपलोड करू शकता.
 • शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपले सबमिशन बदलू शकता.
प्रश्नमंजुषा स्पर्धेबाबत…
 • ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा एक भाग म्हणून ३० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील.
 • प्रत्येक प्रश्नात योग्य उत्तरासाठी दोन गुण असतील.
 • चुकीच्या उत्तरासाठी एक नकारात्मक गुण असेल.
 • उत्तर न देता शून्य गुण असतील.
 • आपल्याला आपली स्पर्धा १५ मिनिटांत पूर्ण करावी लागेल.
 • एकदा उत्तर सादर केल्यावर आपण ते बदलू शकत नाही किंवा प्रश्न पुन्हा पाहू शकत नाही.
 • ‘स्टार्ट टेस्ट’ बटणावर क्लिक करताच वेळ सुरू होते.
 • काही कारणास्तव व्यत्यय आल्यास, आपल्याकडे स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा पर्याय आहे.
 • प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्तीर्ण होण्यासाठी ६० पैकी किमान २४ गुण मिळवणे आवश्यक आहे.
स्पर्धा नोंदणी…
 • जे विद्यार्थी सहभागी होण्यास उत्सुक आहेत त्यांनी आपली अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. येथे नोंदणी करा.
 • विद्यार्थ्यांनी त्यांचे तपशील भरणे आवश्यक आहे, ज्यामध्ये नाव, वय, संपर्क क्रमांक, शाळा आणि वर्गविशिष्टांचा समावेश आहे.
 • नोंदणी झाल्यानंतर सर्व संबंधित माहिती आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविली जाईल.
 • आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर एक लिंक देण्यात येईल. त्याद्वारे आपणास ऑनलाइन चित्रकला/रेखांकन व ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
 • नोंदणी करताना काही अडचण आल्यास harish@iirs.gov.in या मेलवर साईट Administrator यांचेशी संपर्क करावा.
 • येथे नोंदणी करा 


grammar spot the error


34 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here