Home STD 10 Std.10: Maharashtra State Board: Sub_Science I & II- Useful Study Material

Std.10: Maharashtra State Board: Sub_Science I & II- Useful Study Material

std 10 science study material

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार…

मी श्रीकांत देशपांडे (M.Sc.B.Ed)
मित्रांनो आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. आपले जीवन सुखी, सोपे आणि सोयीस्कर करून देण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे. लहानात लहान गोष्टीचा विचार केला असता तेथे आपणास विज्ञान पाहायला मिळते. छोट्या पेन पासून ते लॅपटॉप पर्यंतच्या सर्व गोष्टी या विज्ञानाची देणगी आहे.
.
मी गेल्या १५ वर्षांपासून सोनाई माध्यमिक विद्यालय, गुंजोटी ता. अहमदपूर जि. लातूर या विद्यालयात विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहे. प्रभावी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व संशोधनात्मक वृत्ती वृद्धिंगत करणे हे मी माझे ध्येय समजतो. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अध्ययन व अध्यापन साहित्य निर्माण करून विज्ञान विषय साध्या व सोप्या पद्धतीने त्यांना समजून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो.
.
याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून मी
https://www.youtube.com/c/DigitalVidnyanShrikantDeshpande

या  Youtube Channel च्या माध्यमातून इयत्ता १० वी च्या वर्गाचे विज्ञान विषयाच्या अवघड तसेच क्लिष्ट वाटणाऱ्या पाठांचे तसेच महत्त्वाच्या संकल्पनांचे व्हिडिओज शक्य होईल तितक्या साध्या व सोप्या भाषेत व एनिमेशनसह बनवत आहे. आपणास मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील इयत्ता १० च्या वर्गात शिकणारे असंख्य विद्यार्थी माझे व्हिडीओज अभ्यासत आहेत.

.
विद्यार्थी मित्रांनो, मार्च २०२३ बोर्ड परीक्षा काही दिवसांवर आली आहे. या परीक्षेसाठी विज्ञान-तंत्रज्ञान-१विज्ञान-तंत्रज्ञान-२ या विषयांचे अत्यंत उपयुक्त असे काही सराव परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका व्हिडीओज मी आपणास उपलब्ध करून देत आहे. सदर व्हिडीओज आपणास बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यास निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहेत.


 

Previous articleStd.12-Maharashtra State Board_Appreciation of all Poems
Next articleVitamin C (Ascorbic Acid)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here