महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. यावर्षी करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मात्र शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट
mahresult.nic.in, mahahsscboard.in
वर निकाल उपलब्ध होणार आहे.
२८ मे रोजी इयत्ता १० वीसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आलं. त्यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुली आहेत.
SSC परीक्षेचा निकाल बोर्डाच्या खालीलपैकी कोणत्याही अधीकृत संकेतस्थळावर क्लिक करून पाहता येईल