कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात Coffee with Director हा कार्यक्रम अथवा उपक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला आहे.
सदर कार्याक्रमाबाबद वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त शिक्षक या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी असे शिक्षण विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला LIVE जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा