पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ चे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी येथे मिळतील. त्यासाठी हे पेज सेव करा व नियमित भेट द्या…. |
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. |
पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यामध्ये (विदर्भ वगळता) दि.२० जून ते २३ जुलै, २०२२ आणि विदर्भ भागातील शाळांमध्ये दि.४ जुलै ते ६ऑगस्ट, २०२२ या कालावधीत पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे नियोजित आहे. |
हे सुद्धा पहा:
इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे मोफत दैनंदिन Grammar Worksheets डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हे सुद्धा पहा:
इयत्ता १० वी च्या इंग्रजी विषयाच्या महत्वाच्या Links पाहण्यासाठी येथे क्लिक करा