Home कला उत्सव २०२१: माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी

कला उत्सव २०२१: माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी

kala utsav 2021


माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.


शास्त्रीय गायन पारंपारिक गायन शास्त्रीय संगीत वादन
पारंपारिक लोकसंगीत वादन शास्त्रीय नृत्य पारंपरिक लोकनृत्य
द्वीमितीय चित्र त्रिमितीय चित्र शिल्प व खेळणी
  • कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo)सहभाग असणार आहे.
  • कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
  • तयार केलेला व्हिडिओ व त्यासोबत कला सादर करतानाचे वेगवेगळे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२१ या हॅशटॅगचा वापर करून दि. १३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
  • तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी या पोर्टल जाऊन करावी. व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक पोर्टलवर माहिती भरताना योग्य ठिकाणी Paste करावी. पोर्टलवर नोंदणी करताना सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
  • प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून केली जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमधून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल.
  • तदनंतर राज्यस्तरावर समितीमार्फत निवडलेले सर्वोत्कृष्ट स्पर्धक Online /प्रत्यक्ष सादरीकरण करतील. यामधून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड राज्यस्तरावर करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील.
  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या online पद्धतीने होणार आहेत. राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत स्वतंत्रपणे कळविले जाईल.


सहभाग नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा