दीपावली भेट-Diwali Gift
डाउनलोड करा इंग्रजी व्याकरण मोफत स्मार्ट PDF Book
दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो. हा सण भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा एक भारतीय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. आनंद, सुसंवाद आणि विजयाचे स्मरण करून देणारा हा एक आनंदी क्षण कि ज्याचे वर्णन ‘प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव’ असे महाकाव्य रामायणात केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण येतो.
दिवाळीचा सण पाच दिवस चालतो- धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा संपत्तीची पूजा. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दिवाळी उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. या दिवशी, लोक सकाळी लवकर उठतात आणि स्नान करण्यापूर्वी त्यांना सुगंधी तेल लावतात ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व पापे आणि अशुद्धता दूर होतात. तिसरा दिवस मुख्य उत्सव असतो. या दिवशी लक्ष्मीची (संपत्तीची देवता) पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. यालाच लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. लोक नवीन कपडे घालतात, पूजा करतात आणि दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. दिवाळी उत्सवाचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा पाडवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा पराभव केला होता असे म्हणतात. गायीच्या शेणाचा वापर करून लोक गोवर्धनाचे प्रतीक असलेली एक छोटी टेकडी बनवतात आणि त्याची पूजा करतात. दिवाळी उत्सवाचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी जाऊन भवाला ओवाळतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर भाऊ त्यांच्या बहिणींना काहीतरी भेटवस्तू देतात.
डाउनलोड करा
Happy Birthday शुभेच्छा संदेश व कविता
वसुबारस |
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! |
धनत्रयोदशी |
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! |
नरक चतुर्दशी |
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो ! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! |
लक्ष्मीपूजन |
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
|
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा |
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! |
भाऊबीज |
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ! |
आपल्या प्रियजनांना पाठविण्यासाठीचे दीपावली संदेश आजच डाउनलोड करा |
“सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…” |
“दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!” |
“पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास, फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली..!” |
“रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…” |
“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख… क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत… दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…” |
“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…” |
“आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो…” |
“प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो. दिवाळीच्या खूप शुभेच्छा!!!” |
“जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रिती अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती! शुभ दीपावली…” |
“पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे प्रार्थना करतो, सुख-समृद्धी लाभूदे तुम्हाला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!” |
“सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली, नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली…” |
“आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो, कर्माची वात, भक्तीचं तेल आत्म जाणिवेची ज्योत लावून आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो… हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“मराठमोळी संस्कृती आपली मराठमोळा आपला बाणा मराठमोळी माणसे आपण मराठमोळी आपली माती अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती शुभ दिपावली…” |
“यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके, या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा…” |
“घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!!!” |
“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…” |
“नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली.. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली.. सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली.. शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!!!” |
“चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी..!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…” |
“दारी दिव्यांची आरास, अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण… दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!!!” |
“घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!!!” |
“चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !! दिपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!” |
“आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…” |
“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…” |
“दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास… शुभ दीपावली!!!” |
“झिलमिलाते दीपों की रोशनी से प्रकाशित ये दीपावली आपके घर में सुख समृद्धि और आशीर्वाद ले कर आए… शुभ दीपावली!!!” |
“दीयों की रोशनी से झिलमिलाता आँगन हो पटाखों की गूंजों से आसमान रोशन हो ऐसी आये झूम के यह दिवाली आपकी हर तरफ खुशियों का ही मौसम हो दिवाली की शुभकामनाएं… ” |
“दीवाली है रौशनी का त्यौहार लाये हर चेहरे पर मुस्कान सुख और समृधि की बहार समेट लो सारी खुशियाँ अपनों का साथ और प्यार इस पावन अवसर पर आप सभी को दीवाली का प्यार शुभ दीवाली!!!” |
“हर घर में दिवाली हो, हर घर में दिया जले जब तक ये रहे दुनिया जब तक संसार चले दुःख, दर्द, उदासी से हर दिल महरूम रहे पग पग उजियालो में जीवन की ज्योति जले दिवाली मुबारक हो दोस्तोंं…” |
“दीपों का ये पावन त्यौहार आपके लिए लाये ख़ुशियाँ हज़ार लक्ष्मी जी विराजें आपके द्वार हमारी शुभकामनाएं करे स्वीकार शुभ दीपावली!!!” |
“दीपों का उजाला, पटाकों का रंग, धुप की खुशबु, प्यार भरी उमंग, मिठाई का स्वाद, अपनों का प्यार, मुबारक हो आपको दिवाली का त्यौहार. शुभ दीपावली!!!” |
“हर घर में दिवाली हो, हर घर में दिया जले जब तक ये रहे दुनिया जब तक संसार चले दुःख, दर्द, उदासी से हर दिल महरूम रहे पग पग उजियालो में जीवन की ज्योति जले शुभ दीपावली!!!” |
“दीप से दीप जले तो हो दीपावली, उदास चेहरे खिलें तो हो दीपावली, बाहर की सफाई तो हो चुकी बहुत दिल से दिल मिले तो हो दीपावली। शुभ दीवाली…” |
“दीप जलते रहे, मन से मन मिलते रहें, गिले-शिकवे सारे दिल से निकलते रहें, सारे विश्व भर में सुख शान्ति की प्रभात ले आए, ये दीपों का त्यौहार ख़ुशी की सौगात ले आए। दिवाली की शुभकामनाएँ…” |
“हर घर में हो उजाला, आए ना कभी रात काली, हर घर में मने ख़ुशियाँ, हर घर में हो दिवाली। शुभ दीवाली…” |
“दीपक की रौशनी, मिठाइयों की मिठास, पटाखों की बौछार, धन-धान की बरसात, हर दिन आपके लिए लाए दिवाली का त्यौहार। दिवाली की शुभकामनाएँ…” |
हे सुद्धा पहा:
इयत्ता १० व १२ वी दीपावली सुट्टी अभ्यास: सराव प्रश्नपेढी |
विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारचे प्रमाणपत्र: प्रश्नमंजुषा |
ENGLISH MOTIVATIONAL IMAGES |