Home शासकीय आदिवासी वसतिगृह ONLINE प्रवेश-2021-22

शासकीय आदिवासी वसतिगृह ONLINE प्रवेश-2021-22

Govt. of Maharashtra-Tribal Dept. Hostel Admissions 2021-22


सन 2021-22 साठी ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


महत्वाच्या सूचना

  1. सर्वांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष सण २०२१-२२ साठी वसतिगृह आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे, विद्यार्थां योजनेसाठी दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
  2. Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.
  3. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
  4. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
  5. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना सदर नाव हे आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत असावे.
  6. वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
  7. विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
  8. ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
  9. अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.

(अगोदर रजिस्ट्रेशन करावे व नंतर Back to Login वर क्लिक करून Login ID व पासवर्ड टाकून काळजीपूर्वक फॉर्म भरावा)

वसतिगृह प्रवेश नावनोंदणी व प्रवेश Login
करण्यासाठी येथे क्लिक करा

Click here