कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE प्रमाणं महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र अकरावीचे प्रवेश कसे करायचे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहिला होता. यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली व शेवटी अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचे जाहीर केले.
CET अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून…
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आता पुढचा टप्पा म्हणजेच इयत्ता अकरावीचे प्रवेश व अर्थातच सीईटी. सीईटीसाठी प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत-
- २६ जुलै ते २ ऑगष्ट दरम्यान सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.
- सीईटी पोर्टलची लिंक वेबसाइटवर देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकणे अनिवार्य आहे.
- त्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील.
- विद्यार्थ्यांनी होय पर्याय जर निवडला तर त्यांना नोंदणी व पुढील कार्यवाही करायची आहे.
- परीक्षा दिनांक- 21 August 2021 (वेळ- स.११.०० ते १.००)
- परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने होईल.
- परीक्षा केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील.
- सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न परीक्षेला विचारले जातील.
- १०० गुणांच्या या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत.
- परीक्षा ही ओ.एम.आर. (Optical Mark Recognition) शिटवर घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ असेल.
- यासाठी मंडळाकडून स्वतंत्र अभ्यासक्रम निर्गमित केला जाणार आहे.
- निश्चितच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पेलवणारा व सोप्या पद्धतीने मांडलेला असेल.
- सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल.
- सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त जागी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
- हा प्रवेश त्यांच्या इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे दिला जाईल.
NEW LINK
Click here For Registration